Get Mystery Box with random crypto!

पूर्व परीक्षेला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हे बऱ्याच जणांच्य | Pramod Chougule Official Channel

पूर्व परीक्षेला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हे बऱ्याच जणांच्या टेन्शन चा विषय असतो. काही जण तर याला सोडूनच देतात. पण इतिहासाच्या १५ प्रश्नांपैकी ६-७ प्रश्न म्हणजे जवळपास ५०% प्रश्न प्राचीन - मध्ययुगीन चे असतात. मग ज्या पूर्व परीक्षेत १-१ मार्क कट ऑफ पार करण्यात महत्त्वाचा आहे तिथे ह्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला नको. जर तुम्हाला खूप काही वाचायचे नसेल तर किमान ल्यूसेंट GK मधून प्राचीन मध्ययुगीन चे ६०-७० पाने आहेत तेवढी तरी करावीत. हे वाचत असताना PYQ खूप महत्त्वाचे आहेत, त्यांना पाहूनच वाचन करा. त्यातील टेबल्स, महत्त्वाची नावे, घटना क्रम यांना महत्त्व द्या. त्यानंतर वाटलंच तर स्टेट बोर्ड पण करा. पण प्राचीन मध्ययुगीन इतिहास सोडून देऊ नका. हा विषय तुम्हाला लीड मिळवण्यासाठी गरजेचे असणारे १० मार्क्स नक्की देईल.

All the best