Get Mystery Box with random crypto!

पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते | Pramod Chougule Official Channel

पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते, सर्व प्लानिंग बदलतं, आपण स्लो होऊन जातो. हे सर्वांच्या बाबतीत घडत… तुमच्या बाबतीत असे झाले तर टेन्शन घेऊ नका पण त्यातून लवकर बाहेर या. पण तुम्ही असेच राहिलात तर मग आधी चांगला अभ्यास करून देखील एक्साम मधे फटका बसेल. याचे कारण असे की एक्साम पूर्वीचा एक महिना हा गोल्डन काळ असतो. तुम्ही जेवढे एफर्ट इथे टाकाल तेवढं आऊटपुट येणार.
मी पुन्हा सांगतो की ह्याला एक संधी म्हणून बघा.
जे विषय किंवा काही टॉपिक राहिले असतील तर ते वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन चांगली आणि वेळ देऊन होऊ शकते. PYQ वर पुन्हा एक वेळ नजर टाकून घ्या. ज्या गोष्टींच्या पाठांतराची गरज आहे तिथे माइक्रो नोट्स बनवून जास्तीत जास्त वेळ रिवाइज करा.
आणि सर्वात महत्त्वाचे….
ह्या काळात प्रश्नांना एप्रोच कसे व्हायचे, एक्साम मधे कोणते विषय टार्गेट करायचेत, कुठून किती मार्क आले पाहिजेत हे ठरावा.
आणि शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन कशाची आणि कोठून करणार हे आत्ताच ठरवून तसे मटेरियल तयार करा.

The more you sweat in peace, the less you bleed in battle.

All the best