Get Mystery Box with random crypto!

* MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिक | oasis study point

* MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?#*
       समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर  किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो.
1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न
2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न
3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न
4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न
5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न
6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न
7. मराठी - 10 ते 15 प्रश्न
विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.

*MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके*

*1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण प्रश्न विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते* - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती
3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
4.समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
5.बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी 6.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज -  विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)
7.वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक
8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक
9.मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
10. समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले

(कृपया सदर माहिती MPSC  समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)