★ समूहदर्शक शब्द ★ (Collective Words) एका पेक्षा जास्त वस्तू | मराठी व्याकरण English Grammar
★ समूहदर्शक शब्द ★
(Collective Words)
एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.
1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची - झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची - जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे - खिल्लार
14) गुरांचा - कळप
16) चोरांची/लुटारूंची - टोळी
17) जहाजांचा - काफिला
18) तारकांचा - पुंज
19) दुर्वांची - जुडी
20) द्राक्ष्यांचा - घड,घोस
21) धान्याची - रास
22) नारळांचा - ढीग
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके
26) पक्ष्यांचा - थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच
32) फळांचा - घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ