Get Mystery Box with random crypto!

मराठी व्याकरण प्रश्न 1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा. | मराठी व्याकरण English Grammar

मराठी व्याकरण प्रश्न

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2