Get Mystery Box with random crypto!

रोज किती तास अभ्यास करायचा? मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो | Pramod Chougule Official Channel

रोज किती तास अभ्यास करायचा?

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील . मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते . त्यामुळे 15-16 तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.
So be realistic in your study goals.